"हवामान/पर्यावरण विषयक दिन पाहून लेख लिहिण्यामध्ये सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करीन."
हे विषय तुमच्या आवडीचे, जिव्हाळ्याचे आहेत हे मान्य; पण तुम्ही स्वतःला केवळ त्यांच्या परीघात कोंडून घेऊ नये असे मनापासून वाटते. केवळ भौतिकशास्त्रात तुम्ही लिहू शकाल असे कितीतरी विषय आहेत. उदाहरणार्थ क्वॉंटम फिजिक्स -- आमच्यासारख्या सामान्यांना हा अवघड परंतु रोचक विषय तुमच्या सहज शैलीत सोपा करून सांगितलात तर ? श्रोडिंगरची मांजर, प्रकाशाहून जलद गतीने जाणारे अणुकण, स्ट्रिंग सिद्धांत इत्यादी ह्यावरही लिहा.