सहमत. मी गेले ६ वर्षे इथे सदस्य आहे, पण आज प्रथमच माझे विचार लिहित आहे. मनोगतवरील प्रशाकीय हस्तक्षेप व ओपन सोर्सला विरोध या कारणांमुळे मी इथे कधीच लेखन केले नाही. मी नेहमी वाचनमात्र राहिलो. स्पष्ट सांगायचे झाले तर मी मिसळपाव वर जास्त रमतो. तिथेसुद्धा कंपूबाजी आणि संपादकीय हस्तक्षेप आहे, पण तिथले वातवरण अधिक मोकळेढाकळे वाटते.