खरे तर दिवाळी अंकातील लेखनावर प्रतिसाद देताना सदस्यत्वाची आवश्यकता न ठेवण्याचा प्रयोग पूर्वीच यशस्वी झालेला आहे. त्याचेच सार्वत्रिकीकरण करणे शक्य आहे.
हा प्रयोग करून पहायला हरकत नाहीच. प्रायोगिक तत्त्वावर करता येईलच. अनेक नवे प्रयोग, सुधार्णा मनोगताने केल्या आहेत.
माझ्या मनात अनेक दिवस हा प्रश्न होता-
- प्रतिसाद देताना आयडी प्रकाशित न करणे शक्य आहे का?
वाचकांचा पत्र व्यवहार -मते खरी पण कोणाची ते समजण्याची गरज असते का? तर नसावी. लेखनाला प्रतिसाद - ते कोणा एका वाचकाकडून आहेत ते कळण्याची गरज नाही. नाव आले की मूळ काय सांगितले आहे यावर लक्ष जात नाही, देता येत नाही. तर नाव महत्त्वाचे होते. 
नाव आयडी कळले की त्यातून ओळखी होतात तसेच अहंकारही बळावतो. गटबाजीचा फायदा संकेतस्थळाला मिळत असेल तर उत्तम. पण त्या गटबाजीत संकेतस्थळाचे नुकसान होत असेल तर मग नाव , आयडी कळू नये हेच उत्तम.
प्रतिसादाला / लेखनाला श्रेणी देणे मला स्वतःला मान्य नाही. 
सोनाली

थेट इथेच टाइप केल्यावरही इतर ठिकाणचा मजकूर चिकटवण्याचा इरर मेसेज दिसतो आहे. एंटर की मुळे असे होते आहे का?