(सदर किंवा इतर) संकेतस्थळाविषयीचे लेखन असले की भरपूर प्रतिसाद येतात. उदा. सदर चर्चेला आलेले भरपूर प्रतिसाद पाहा. इतर संकेतस्थळे कशी वाईट (ओसाडगाव, नमोगत वगैरे टोपणनावे), तिथला शिष्टपणा विरुद्ध आपला मोकळाढाकळेपणा (कमरेचे सोडून डोक्याला बांधणे), एकमेकांच्या वैयक्तिक चौकशा (रात्री चकण्याला कोथिंबीरीच्या वड्या) वगैरे स्वरूपाच्या चर्चांना उत्तेजन दिल्यास मनोगताची भरभराट होईल असे वाटते.  थोडक्यात 'आपापसात' चे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. एकंदर  (मा्झ्यासकट)  मराठी लोकांना नैसर्गिकरीत्या अशा उखाळ्यापाखाळ्यांमध्येच जास्त रस असल्याने - व मनोगतावर आजकाल असे पूरक खाद्य मिळत नसल्याने - प्रतिसादांचा ओघ आटतो आहे.