शुद्धलेखन चिकित्सक एपीआय स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा असे वाटते.
अगदी आंतरपृष्ठ (इंतरफेस) नाही तरी, फायरफॉक्सचा विस्तार (एक्स्टेन्शन) म्हणून शुद्धिचिकित्सक विकसित करण्याचे चाललेच आहे. हा विस्तार कोठल्याही पानावर वापरण्यासारखा होणार असल्याने तो वापरणे जास्त सुकर होईल हे खरेच. मात्र हे करू लागल्यापासून फायरफॉक्सचेच ऊर्ध्वश्रेणीकरण इतक्या झपाट्याने होत आहे की अनेक वेळा प्रशासनाचे त्याला सामोरे जाण्याचे प्रयत्न थिटे पडले, हे खरेच.
तरीही अनेक लेखक इतर संकेतस्थळांवर, आपल्या अनुदिनीवर लेखन करताना मनोगतावर येऊन मनोगताच्या शुद्धिचिकित्सकाचा वापर करत आहेत हे खात्रीने सांगता येते.