मनोगतापासून प्रेरणा घेऊन बनविले गेलेले फायरफॉक्स विस्तार (एक्स्टेन्शन) आपल्या पाहण्यात आलेच असेल.
दुवा क्र. १

नुसती प्रेरणा नव्हे तर इथला शब्दसंग्रह वापरून हे एक्स्टेन्शन बनविण्याचा माझा विचार होता! पण वर म्हटल्याप्रमाणे मनोगताने आपला शब्दसंग्रह उपलब्ध करून दिला नाही. आणि उपक्रमावरील स्वयंसेवकांनी ओंकार जोशीच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले.
दुवा क्र. २

हा प्रकल्प ओंकारने कटाक्षाने ओपन सोर्स ठेवला असल्यामुळे त्यात कोणीही सहभागी होऊ शकतो, नवीन शब्दांची भर घालू शकतो वा असलेला कोड, शब्दसंग्रह वापरून त्याचा हवा तसा उपयोगही करू शकतो.

(टीपः  हा प्रतिसाद म्हणजे विषयांतराचा जाहीरातबाजीसाठी केलेला उपयोग नव्हे)