१. ॐ नमोजी गणनायका । सर्वसिद्धी फलदायका । अज्ञान भ्रांती छेदका । बोधरूपा ॥
२. रंगी नाचे देवा मोरया । अंदू वाकी पायी घागरिया ॥
३. श्री गणराया वंदन पाया । चौरंग सोडुनी अंगणी या । मूषकवाहन त्यावरी बसून । खेळीया संगती अंगणी या ।।
ह्या तीन गाण्यांच्या MP3 फायली कुणाकडे असतील तर कृपया व्य. नि. ने संपर्क साधा. जालावर ही गाणी ऐकण्यासाठी उपलब्ध असतील तर तो पत्ताही कृपया कळवा.
ह्यातील ॐ नमोजी गणनायका हे गाणे अनुराधा पौडवाल व कोरसच्या आवाजात जालावर उपलब्ध आहे. मात्र मला हवे असलेले गाणे पुरुषाच्या आवाजात आहे (त्यातही कोरस आहे). हे नेमके कोणी गायले आहे हे माहीत नाही. त्याची चालही पौडवालांच्या चालीपेक्षा वेगळी आहे (आणि माझ्यामते जास्त चांगली आहे). हे गाणे माझ्या एका शिक्षिकेने आम्हाला शिकवले होते. ते त्यांच्याकडे एका गणपतीच्या गाण्यांच्या कॅसेटमध्ये होते. आता त्या कॅसेटचे नाव व गायकांची नावे आठवत नाहीत आणि आता त्या शिक्षिकाही हयात नाहीत.