खरेतर राष्ट्रपतींना दया दाखवावी असे वाटते काय हाच प्रश्न आहे व दुसरा ते खरोखरच दया स्वतःच्या मर्जीने दाखवतात काय हा दुसरा प्रश्न आहे कारण माजी राष्ट्रपतींनी दाखवलेली दया हेच होय. कारण राष्ट्रपती एकदम इतक्या लोकावर दया दाखवतील हे पटत नाही मला वाटते हे सर्व फाइल निकाली काढल्या सारखे वाटते. व अलीकडे आलेल्या बातम्यांतून एक वाटते की दयेचा अर्ज जरी आरोपीने केला तरी त्यावर सही करा अगर नको यासंबंधी शिफारस असल्या शिवाय तो पुढे जात नाही व राज्यकर्ते मतावर डोळा ठेवूनच त्यासंबंधी शिफारस करतात त्यामुळेच मागे शहीद सैनिकाच्या बायकांनी पारितोषके परत करू म्हटले तरी केवळ मताच्या भीतीमुळे राज्यकर्ते तो दयेचा अर्ज निकाली काढू इच्छीत नाहीत.
म्हणून न्यायमूर्तींनी आता नवीन अशी परिस्थिती येईल तेव्हा शिक्षेत नमूद करावे जोपर्यंत आरोपीने केलेला दयेचा अर्ज निकाल लागायचा असेल तो पर्यंत पूर्वी जन्मठेप दिल्यानंतर जी कामे आरोपींना करायला सांगत (चक्की पिसणे, तेलाचा घाणा) वगैरे कामे करायला लावावीत कारण जर त्याला लवकर फाशी दिला नाही तर पुन्हा हे राजकारणी नेते न्यायालयांवर निकाल फिरवण्या साठी दबाव आणतात. (पंजाब व काश्मीर)