लेखातील इडलीच्या चवीविषयी मांडलेल्या मतांशी अजिबात, व डोशाच्या चवीविषयी मांडलेल्या मतांशी फारसा सहमत नसूनही एक लेख म्हणून लेख आवडला. 'वन मॅन्स मीट इझ अनदर मॅन्स पॉय्झन' ह्या म्हणीचा "चविष्ट इडली" हा शब्दप्रयोग वाचून पुनःप्रत्यय आला.

अवांतरः चिनी डोसा, चिनी भेळ, चिनी चकली इत्यादी आजकाल बाजारात मिळणाऱ्या पदार्थांची खबर चिन्यांना लागली तर ६२च्या युद्धाची पुनरावृत्ती होईल की काय अशी मला कधी कधी भीती वाटते.