प्रशासक : मनोगतवर ignore ची सोय करणे शक्य आहे का ?ज्यांचे प्रतिसाद एखाद्याला वाचायचे नसतील, त्यांची यादी सदस्यांनी आपल्या pofile मध्ये साठवून ठेवावी. जेणे करून त्या सदस्याला दुसऱ्या सदस्याचे कुठलेही निरोप अथवा चर्चेतील प्रतिसाद दिसणार नाहीत. बरेच वाद टळतील व चर्चा निकोप राहतील, टवाळांचा आपोआप बंदोबस्त होईल. प्रतिसादात, ह्याप्रतिसादाला उत्तर द्याह्यांना वैयक्तिक निरोप पाठवा नंतर ह्यांच्याकडे दुर्लक्ष करा अशी अजून एक सोय असावी.

जोपर्यंत अशी सोय उपलब्ध नाही, तोवर असल्या लोकांना प्रतिसाद न देता फ़क्त शीर्षकात दुर्लक्ष आणि प्रतिसादातही दुर्लक्ष इतकेच लिहावे. टिका-टिप्पणी, उत्तरे देऊ नयेत.

ह्यावर मनोगतींनी आपापले म्हणणे मांडावे.

धन्यवाद.
मयुरेश वैद्य.