अगदी पहिल्यांदा खाल्ला तेव्हा मला काट्या चमच्याने मडो (किंवा काहीच) खाणे येत नव्हते. म्हणून मी आपला पोळीसारखा उलगडून आतल्या भाजीबरोबर खाल्ला. त्यानंतर मला अनेकांकडून मडो काट्याचमच्याने खाण्याच्या सूचना मिळाल्या. काही काळाने त्याची सवय झाली, आणि मी काट्या चमच्याने खाऊ लागलो.

पुढे पुण्यात रजनीश आश्रम आला (ओशो नव्हे. माझ्या आठवणीप्रमाणे तोपर्यंत ते आचार्य रजनीशच होते!). रजनीशांचे परदेशी शिष्य पुण्यात दिसू लागले. ते मडो खात तेव्हा हाताने खात असत (असे मला समजले) त्यानंतर मी एकदा सवयीप्रमाणे काट्याचमच्याने मडो खाताना दिसल्यावर मला पुन्हा हाताने खाण्याच्या प्रेमळ सूचना मिळाल्या.

सध्या मी मडो खातो तेव्हा हातानेच खातो. (आणखी काही नवी पद्धत आली असेल तर कल्पना नाही )