राजकीय बातम्या सोडल्या तर तुलनेने सकाळ बऱ्यापैकी वाचनीय असतो.तश्याही राजकीय बातम्या आजकाल जालावर लगेचच वाचायला मिळतात. त्यासाठी दुसऱ्या दिवशीच्या सकाळीची आणि कुठल्याही वर्तमानपत्राची वाट पाहावी लागू नये.
म.टा.ची पुणे आवृत्ती फारशी आवडत नाही. लोकसत्ता ठीक असतो पण त्याचीही राजकीय मते ठाम आणि एकांगी असतात.
छापील माध्यमांच्या बाबतीत आपल्याला फारसे निवडस्वातंत्र नाही हे खरे. त्यामुळे कोणतेही वर्तमानपत्र घेण्याचे थांबवून त्या जागी दुसरे एखादे वर्तमान पत्र सुरू करण्याने फारसा फरक पडणार नाही.