अमोल पालेकरला आपला चित्रपट राष्ट्रीय पातळीवर पाहीला जावा असे वाटत असेल, आणि त्याकरता चित्रपट हिंदीमध्ये असणे अनिवार्य आहे. फारच कमी रसिक 'subtitles' वाचत मराठी चित्रपट पाहण्याची तसदी घेतात. शिवाय त्यामुळे चित्रपटाचा आस्वाद घेणे काही प्रमाणात उणावते. या सर्व गोष्टींचा विचार करुन त्याने आपला चित्रपट हिंदीमध्ये काढला हे योग्यच वाटते.
'गांधी' या रिचर्ड ऍटेनबरोच्या चित्रपटात तर साधा मजूरही अस्खलित ईंग्लिश बोलतो, कारण ऍटेनबरोला आपला चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचा होता.
उद्या म्हणूनच, कुणी 'श्वास' पासून प्रेरणा घेऊन पूर्णपणे ईंग्लिशमधून बोलणार्या मराठी व्यक्तीरेखांवर चित्रपट काढला तर त्यात काही वावगे होईल असे मला वाटत नाही.