१. मनोगतवर लिहीत असताना,एखादा भाग निवडून त्याला कॉपी करण्यासाठी नेहमीची कंट्रोल+सी , इथे वापरता का येऊ नये?
तसेच इतर पर्यायासंबंधी म्हणावेसे वाटते. कंट्रोल+एक्स, कंट्रोल+व्ही, इत्यादि.
२. तसेच, लेखनाचा एखादा भाग निवडून झाल्यावर, तो निवडलेल्या अवस्थेत असताना जर मी लिहायला घेतले ते केलेली निवड रद्द होते आणि लेखन आधीच्या लिहिलेल्या भागाच्या आधी सुरू होते. हे असं नकोय!! आधीचे लेखनावर नवीन लेखन ओवरराईड व्हायला हवे.
३. माझा वैयक्तिक अनुभव: (मी मोझिला फायरफॉक्स-११ ब्राऊजर वापरतोय)
"जाण्याची नोंद" वर क्लिक केले असता, पहिल्यांदा काहीच होत नाही. पुन्हा एकदा क्लिक करावे लागते. आणि मग, ऍक्सेस डिनाइड असे पान येते.ही काय भानगड आहे.
४. ज्या भागात लेखन करता येते, तिथे "टॅब" कळ का वापरता येत नाही. मला दोन शब्दात ३ टॅब इतके अंतर द्यायचे झाल्यास , आणि शब्द बरेच असल्यास, दिवसभर स्पेस कळ धरून ठेवायची?
५. अक्षरांचा "फाँट-साईझ" का वाढवता येत नाही?
६. मला माझ्या लेखनात काही चित्रे टाकायची झाल्यास, साध्या "कॉपी-पेस्ट" ने का करता येऊ नये?
७. लेखन किंवा प्रतिसाद दिल्या दिल्या तो प्रकाशित का होऊ नये. असे उपलब्ध झालेस, आवश्यक असल्यास, सलगपणे चर्चा ही करता येऊ शकेल ना!!
८. एखाद्या लेखाला "पाहुणा" किंवा "निनावी" म्हणून प्रतिसाद देण्याची व्यवस्था असण्यास हरकत नसावी. कारण, लेख वाचल्या वाचल्या प्रतिसाद काय द्यायचा हे सुचत जाते, अशावेळी जर सदस्य व्हायची प्रक्रिया (किंवा येण्याची नोंद) करत बसलेस प्रतिसाद देताना परत आठवत बसावे लागते. (माझा वैयक्तिक अनुभव)
९. एखादा लेख, मुख्य पानावर किती दिवस असावा हे ठरवणे आवश्यक आहे असे वाटते. त्या लेखावर किती चर्चा, प्रतिसाद आहे ह्यावर ठरवता येईल. (आताचेच मुख्य पानाचे उदाहरण देता येईलः ढेसे ची भाजी, पालक वड्या, चटका, हे इथं इतके दिवस आहेत, की त्या सगळ्यांना आता बुरशी येऊन त्या बुरशीलाही बुरशी लागली असती. )
हुश्श्य.... सध्यातरी इतकेच पुरे.