माफ करा जोशी महोदय, आपली प्रतिक्रिया थोडी टोकाची वाटते. प्रत्येक संस्थळाला काही मर्यादा असतात आणि जोपर्यंत त्या आपल्या लेखन - वाचनाआड येत नाहीत तोपर्यंत सहन करायला हरकत नाही.
चित्रे थेट प्रत्यांकित करा आणि चिकटवा हे मराठीतल्या माझा वावर असलेल्या कुठल्याही संस्थळावर शक्य नाही मात्र चित्र द्यायचा मार्ग तितकासा दुर्लभ नाही. प्रतिसाद म्हणाल तर माझे सर्व प्रतिसाद मला विनाविलंब प्रकटलेले दिसतात. 'जाण्याची नोंद' संदर्भीत अडचण मला अन्य संस्थळावरही येते.
मनोगत तांत्रिक प्रगती नक्कीच करेल, मला त्यातले काही समजत नसले तरी खात्री आहे.
मुळात माझ्या चर्चेचा रोख तांत्रिक नव्हता तर रोडावलेले लेखन व प्रतिसाद यावर होता. जर संस्थळावर यावेसे वाटत असेल, नव्हे येणे अगत्याचे वाटत असेल तर तांत्रिक बाब काहीशी दुय्यम ठरते. आवडीच्या उपाहारगृहात जेवण्यासाठी आपण रांगेत थोडावेळ विनातक्रार उभे राहतो, त्याऐवजी जागा दिसते म्हणून दुय्यम उपाहारगृहात आपण (म्हणजे मी तरी) जात नाही. निदान मला तरी हे संस्थळ तांत्रिक दृष्ट्या मागास वा नित्कृष्ठ वाटत नाही आणि ते लेखन वा प्रतिसाद कमी असण्याचे कारण नक्कीच नाही.
स्पष्टोक्तीबद्दल आगाऊ क्षमस्व, राग नसावा ही विनंती.
साक्षी