ध्रुवपदाचे भाषांतर :
ज्या न वाटेवरी घर तुझे साजणी
त्या न वाटेवरूनी मला जायचे
पथ घरावरुन जो जात नाही तुझ्या
त्या पथी मज न पाऊल ठेवायचे ।ध्रु।
प्रशासक कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार.
इतर सदस्यांनी केलेली भाषांतरे :
मिलिंद फणसेः
ज्या पथावर तुझे घर नसे साजणे
त्या पथावर मला ना कधी जायचे
मार्ग द्वारावरुन जो तुझ्या जाइना
त्यावरी पाय मजला न ठेवायचे
कृष्णकुमार जोशीः
घर तुझे नाही ज्या आऽळीत साजणी
आळिमधुनी आम्ही त्या न जाऊ कधी
वाट दारावरून् जी न जाई तुझ्या
वाट ती मी कशाला तुडवू कधी
दोघांनाही धन्यवाद.