सर्वसाक्षी,
प्रथम मी तुमचे यासाठी आभार मानतो की माझ्या कुठल्यातरी लेखाला प्रतिसाद तरी आला. अस्तु.
सर्वप्रथम हे मी स्पष्ट करू इच्छितो की, मी फक्त कसं असायला हवं हे सांगितलंय. असायलाच पाहिजे असा अट्टहास नाही.
प्रतिसाद म्हणाल तर माझे सर्व प्रतिसाद मला विनाविलंब प्रकटलेले दिसतात.माझं असं म्हणणं होतं की प्रतिसाद लिहून सुपुर्द केल्या केल्या तो प्रकाशित व्हावयास हवा. (मायबोली वर होतो. )
मुळात माझ्या चर्चेचा रोख तांत्रिक नव्हता तर रोडावलेले लेखन व प्रतिसाद यावर होताबरोबर आहे. पण, मी माझ्या प्रतिसादात ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, त्या काही प्रमाणात का होईना, रोडावलेले लेखन व प्रतिसाद यास कारणीभूत आहेत असे मला वाटले. उदा. कंट्रोल+सी कंट्रोल+एक्स, कंट्रोल+व्ही, इत्यादि. ह्या गोष्टी लेखन जलद करण्यासाठी मदत करतात.(मायबोली वर हे होतंय)
जाण्याची नोंद' संदर्भीत अडचण मला अन्य संस्थळावरही येते.मग ही खरंच अडचण नाही का? हं, आता ती, तुम्ही छेडलेल्या विषयासंदर्भात नाही हे मान्य.
आवडीच्या उपाहारगृहात जेवण्यासाठी आपण रांगेत थोडावेळ विनातक्रार उभे राहतो,मान्य. पण, सर्वसाक्षी, जेवण मिळाल्यानंतर समजा तुम्हाला टेबल डळमळणारं मिळालं किंवा अन्नात खडा वगैरे आला, किंवा दुसऱ्या वाढीचे अन्न वेळेवर मिळालं नाही, वेटरांची संख्या पुरेशा प्रमाणात नसेल, वगैरे....(मी इथं काहीच अडचणी मांडल्यात) तर मग गिऱ्हाईकांची संख्या कालांतरानं कमी नाही का होणार?
निदान मला तरी हे संस्थळ तांत्रिक दृष्ट्या मागास वा नित्कृष्ठ वाटत नाहीअहो, मी कुठं म्हटलंय हे संस्थळ, निकृष्ट वगैरे आहे म्हणून. छे. उलट मी तर म्हणतो की मनोगतवरची पानांची मांडणी वगैरे इतर सर्व संस्थळांच्या तुलनेत बरीच उजवी आहे.
अक्षरांचा फाँट साईझ वाढवता न येणं ही अडचण नाही का?
स्पष्टोक्तीबद्दल आगाऊ क्षमस्व, राग नसावा ही विनंती.भले, अहो सर्वांच्या साक्षीनं सांगतो, राग वगैरे काही मला आलेला नाहिए. तुम्ही काही माझ्यावर वैयक्तिक टीका किंवा तत्सम काही केलेले नाही.