होम्सच्या गोष्टीमधील अजुन एक सुंदर कथा अनु यांनी सांगीतलेली आहे. मला या कथेमध्ये आवडलेल्या गोष्टी.
१. निरीक्षण आणि निष्कर्षाचा परमोच्च बिंदु टोपीच्या निरीक्षणातून होम्स सांगत जातो. आपण वाचता वाचता अवाक् होत जातो. ( होम्स- वॅटसन्स चा संवाद मूळातच वाचायला हवा.). असाच एक प्रसंग हॉउंड ऑफ बेसकर व्हिल मध्ये आहे. तेथे काठी चे निरीक्षण नोंदवले आहे. तिसरा प्रसंग होम्स घड्याळाचे निरीक्षण करुन वॅटसन्सच्या भावाची इत्यंभुत माहिती देतो. कथेचे नाव मी विसरलो आहे.
२. नीलमणी चा शोध घेत घेत होम्स जात असतो. तेथे त्याला लांब कल्ले ठेवलेला मनुष्य भेटतो. होम्स त्याच्याशी पैज लावतो आणि बहुमुल्य माहिती त्याच्याकडून अलगद काढतो. यात होम्सचे व्यवहार चातुर्य वाखाणण्यायोग्य असे आहे. कोण माणुस कसा वागेल हे ठरवण्याची क्लुप्ती मला फारच आवडलेली आहे.
चला बऱ्याच दिवसानंतर होम्सच्या आठवणींना उजाळा मिळाला.
द्वारकानाथ