पण मी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या (सूचना नव्हे, त्यावर सोल्यूशन्स) इतर
संस्थळावर उपलब्ध आहेत. म्हणून त्या मनोगतावर उपलब्ध व्हाव्यात हीच माझी
इच्छा आहे
इतरांचे चांगले गुण पाहून ते आत्मसात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न मनोगताच्या जन्मापासून चालू आहे. दरवेळी त्याला यश येतेच किंवा तो सर्वांच्या ध्यानात येतोच असे नव्हे. मनोगताची संपादन सुविधा थेट एचटीएमएल संपादन करता यावे ह्या दृष्टीने विकसित केलेली आहे. जेव्हा फक्त इंटरनेट एक्स्प्लोअरर वरच हे शक्य होते त्या काळात ती लिहिली गेलेली आहे. (तेव्हा नेटस्केप मध्ये असे लिहिण्याची सुविधा केवळ नुकती निर्माण झालेली होती. फायरफॉक्स किंवा क्रोम हे तर नव्हतेच.) ज्यांना एचटीएमएल (आणि तेही देवनागरीत) संपादन करण्यात स्वारस्य आहे अशांना येथे लेखन संपादन करण्यात इतक्या अडचणी वाटत नाहीत. बाकीच्यांना त्याचे इतके अप्रूप वाटणार नाही हे ही खरेच. (अर्थात हे समर्थन समजू नये. ब्राउझर्समध्ये झपाट्याने बदल होत आहेत आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी काहीतरी युक्ती करणे आवश्यक आहे.).
अशी सुविधा मनोगताहून चांगली कोठे दिसली तर ती पाहून तिचा अभ्यासही केला जातोच तेव्हा तुम्हाला एखादा विवक्षित गुणविशेष कोठे दिसला तर त्या (एकेका)विषयी नेमकी माहिती द्यावी, म्हणजे पडताळून पाहता येईल.