"ये पदर प्रीतिचा घेउनी ओढुनी" ऐवजी "ये पदर प्रीतिचा घेउनी लेउनी" असेही करता येईल ना?
कारण पदर हा हिंदीत "ओढतात" तर मराठीत तो ओढत नाहीत तर "घेतात" किंवा "लेऊन येतात". पैकी "घ्यायची" प्रक्रिया तुमच्या ओळीत आहे. त्यामुळे लेउन हे जरा जास्त योग्य होईल असे मला वाटते हं...
मराठीत पदर ओढणे असे म्हणत नाहीत हे अगदी बरोबर. पण पदर ओढून घेणे म्हणतात ना राव. म्हणून प्रीतिचा पदर ओढून ये असे नाही म्हटलेले. प्रीतिचा पदर ओढून घेऊन ये असे म्हटलेले आहे.
"पथ घरावरून जो जात नाही तुझ्या" ही ओळ गाताना काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय, की मलाच जमत नाहिए गायला.
चुकायचे काही कारण नाही
पथ घरा - वरुन जो - जात ना - ही तुझ्या
गालगा - गालगा - गालगा - गालगा
... असे गण पाडा (घरावरुन मध्ये रु ऱ्हस्व घेतलेला आहे म्हणून तुमचा गोंधळ झाला असणार