राधिकाताई,
आपण छान प्रश्न उपस्थित केला आहे. आपली मराठी माता आणि तिच्या हिंदी, उर्दू, तमिळ, तेलुगू ह्या बहिणी ही सर्व संस्कृतआजीचीच लेकरे असल्यामुळे सर्व शब्दांच्या मूळांचा शोध संस्कृतापर्यंत पोहोचणे साहजिकच आहे असे वाटते.
विशाल हृदय लाभलेला मराठी माणूस हा प्रामाणिक असल्याने आपले शब्द अमुक भाषेतून आले हे प्रांजळपणे मान्य करतो. काही इतर भाषिक केवळ दुरभिमानापायी अथवा अज्ञानापायी ते मान्य करत नाहीत हाच काय तो फरक असे वाटते.
आपला
(कुटुंबवत्सल) प्रवासी