मला वाटते की मूळ मुद्दा सभासद एखाद्या स्थळाकडे वारंवार का येतात हा आहे.
१. काही लिहून प्रकाशित करण्यासाठी
२. माझ्या लेखनावर इतरांचे काय मत आहे ते पाहण्यासाठी
३. इतरांचे लेखन वाचण्यासाठी
४. इतरांच्या लेखनावर मतप्रदर्शन करण्यासाठी
५. वाद चर्चा करण्यासाठी

मनोगतावर सुरुवातीच्या काळात प्रत्येक लेखावर / कवितेवर कोणीतरी प्रतिक्रिया देत असे. त्यावर काही बाही चर्चा होत असे. म्हणजे संस्थळाचा उपयोग केवळ लेखन प्रकाशित करण्यासाठी/ वाचण्यासाठी न होता गप्पा मारण्यासाठी, सोशल नेटवर्किंगसाठी होत असे. इतर संस्थळात आता खरडवही, गप्पांचे धागे असे विविध प्रकार केवळ या सोशल आस्पेक्टससाठी आहेत. मनोगतावर सुरुवातीला व्यक्तिगत निरोपाची सोय मिळाल्यावर रोज इथल्या मित्रमंडळींशी निरोपानिरोपी होत असे. ते सगळे विदागार कोसळल्यावर बंद पडले.  मनोगताने गप्पा मारण्याची सोय सुरू करून पाहिली होती पण भरारीघेण्याआधीच तीही बंद झाली. 

उपक्रमाचेही तसेच आहे. तिथे गप्पा मारणे मुळातच अपेक्षित नव्हते. त्याबेताने मूळ उद्दिष्टांशी एकनिष्ठ राहून उपक्रमींचेही बरे चालले आहे असे मला वाटते.

सतत काहीतरी माहितीपूर्ण, आशयघन, उपयुक्त लिहिणे शक्य नाही. ९५% टाइमपास आणि ५ % दर्जेदार साहित्य असे काहीसे प्रमाण कुठेही असावे. मनोगताने अशी टाइमपासची, गप्पा मारण्याची, सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध करून दिली तर सभासद पुन्हापुन्हा येत राहतील. त्यातून लिहिणे, चर्चा असे सगळेच पुन्हा वाढीला लागेल असे मला वाटते.