मनोगताने अशी टाइमपासची, गप्पा मारण्याची, सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध करून दिली तर सभासद पुन्हापुन्हा येत राहतील. त्यातून लिहिणे, चर्चा असे सगळेच पुन्हा वाढीला लागेल असे मला वाटते.

शक्य आहे; पण मनोगतावर समाजाभिसरणाचे धोरण मुख्य नसावे. असलेच तर ते दुय्यम किंवा तिय्यम असे कुठेतरी असावे.
मुख्य भर मराठीचा अधिकाधिक वापर, (क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही प्रकारे) आणि प्रसार / प्रचार असे काहीतरी धोरण राबवलेले दिसते.