आदरणीय प्रशासक,
शुद्धिचिकित्सक हे अत्यंत उपयुक्त साधन देऊन आपण एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे त्याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
इंग्लिश भाषेत अव्यये आणि इतर अनेक गोष्टी स्वतंत्र शब्द म्हणून येत असल्याने प्रत्येक शब्द एकेकदा साठवला की काम होत असावे. मराठीत कोणतेही अव्यय कोणत्याही सामान्य रूपास वचन, लिंग, पुरुष ह्यानुसार अनेक प्रकारे चिकटते. तसेच नामांची आणि क्रियापदांची असंख्य रूपे होतात. ह्याशिवाय संधी आणि समास ह्या शक्ती लक्षात घेतल्यास जणु एकूण शब्दसंख्येवर बंधन असे काही नाहीच मुळी. हे सर्व आपण कसे हाताळता ह्याचे आश्चर्य आणि कौतुक वाटते.
आपला
(आश्चर्यचकित) प्रवासी