मराठी शुद्धलेखनही बदलते आहे. आपोआप आणि हट्टाने. कसेही असले तरी मराठी शुद्धलेखनाचे नियम दहा-पंधरा किंवा वीस-पंचवीस वर्षांनी बदलतीलच.

हा मुद्दा महत्त्वाचा आहे. जे नियम केलेले आणि प्रचलित आहेत त्यांनुसार शुद्धिचिकित्सकाचे काम चालायला हवे ह्यात अजिबात संशय नाही. हे नियम बदलले तर/की त्या नव्या नियमांनुसार शुद्धिचिकित्सकात आवश्यक तसे बदल करावे लागतील, हे उघड आहे.

मात्र काहीही झाले तरी कोठल्याही परिस्थितीत शुद्धलेखन तपासून त्यातल्या चुका (त्या त्या नियमांनुसार) सुधारणे ह्या गोष्टीला कधीही काहीही पर्याय असणार नाही हे मुद्दाम वेगळे सांगायला नकोच.

स्वारस्याबद्दल धन्यवाद.