माझ्या लिखाणात हिंदी शब्द बरेच आहेत. ते जर शुद्ध चिकित्सकाच्या कक्षेत येत नसतील तर लिखाण प्रकाशित व्हायला वेळ का
लागतो ते सांगावे.
लेखन मोठे असेल तर त्या सगळ्याची छाननी करायला जास्त वेळ लागणार. शब्द मराठी आहेत की इतरभाषिक आहेत हे शुद्धिचिकित्सकाला कळणार नाही. मराठी शुद्धलेखनाच्या नियमांनुसार ते तपासले जातील.
तसेच दरवेळेला अशुद्ध शब्दांची यादी जर दिली गेली तर त्याचे शुद्धीकरण लवकर करणे जमू शकेल असे वाटते.
अन्यथा
प्रकाशनास वेळ फार लागेल असे वाटते (या लेखाला तरी बराच वेळ लागला आहे ).
कृपया शुद्धलेखन तपासणी पूर्ण झाल्याचे संकेत(इंडिकेटर) मिळाल्यास बरे
होईल. त्यामुळे दरवेळेला संपूर्ण लेखाचे शुद्धलेखन तपासावे लागणार नाही.
तुमच्या १९ व्या अप्रकाशित भागाचे शुद्धलेखन तपासायला १३ मिनिटांहून जास्त वेळ लागायला नको. इतरभाषिक शब्द न पाहता केवळ चुकलेल्या (लाल अधोरेखित) मराठी शब्दांवर लक्ष केंद्रित करून, त्या त्या शब्दावर टिचकी मारावी आणि डाव्या स्तंभात दिल्या जाणाऱ्या पर्यायांनुसार सुधारणा करावी. तुमच्या लेखनात
घेउ, माणुस, बोलण्यच्या
असे अनेक चुकीचे शब्द आहेत ते सुधारावे. आपल्या मनाचे समाधान झाले की तळातील 'झाले' हे बटण टिचकी मारून दाबावे, म्हणजे सर्व बदललेला मजकूर मूळ संपादकातील मजकुराजागी येईल. तो सुपूर्त करावा.