पूर्वी मनोगतावर हे कुणीतरी विचारले होते आणि मी सविस्तर उत्तर दिले होते. आता परत देत आहे.
ग म भ न
र स त ल ळ
ण प ष फ
व ब ख क
उ ऊ श अ आ अं अः ओ औ
ट ठ द क्ष ढ ड ङ
ह इ ई झ
च घ ध छ
ज ञ ज्ञ य थ
ए ऐ
ऋ ॠ
यांतल्या उ-ऊनंतर शेंडीफोड्या श का येतो ते लहानपणीही समजले नव्हते. खरेतर शेंडीफोड्या श, हा र-सच्या आसपास हवा होता. पण मी दिलेली ही यादी अधिकृत आहे, हे नक्की.