अनेक जिन्नसांवर सरकारी अनुदान असणे म्हणजे आजच्या पिढीने उद्याच्या पिढीच्या कमाईवर आजच डल्ला मारणे. कारण आपल्या देशावरील बाह्य कर्जाचे प्रमाण आजही काळजी करण्यासारखेच आहे. त्याची परतफेड वर्षानुवर्षे सुरूच राहते.

क्रेडिट कार्ड वापरण्यावर टिका करणारे सरकारी अनुदानांचे समर्थन करतात हा फार मोठा विरोधाभास आहे.

अर्थव्यवस्थेला सक्षम करायचे असेल तर प्रत्येकानेच थोडी कळ सोसणे आवश्यक आहे त्यामुळे दरवाढ बहुतेकदा इष्टच.