आपल्याला आपल्या रामदास स्वामींनी सांगितलेच आहे " भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथा हाणू काठी".
मला वाटते अशा स्वरुपाचा उपदेश संत तुकारामांनी केला आहे.
जाऊ द्या हो! कुबडीत नि काठीत घोळ झाला असेल... चालायचेच!
भले तरी देऊ कासेची लंगोटी
कुठली???
कासेची?????? (परि तू जागा चुकलीसी? )
असो.
(बाकी, नाठाळाशी अवलंबायची वर्तणूकसुद्धा "नाठाळाचे काठी देऊ माथा" अशी सांगितलेली आहे, "नाठाळाच्या माथा हाणू काठी" अशी नव्हे, नाही का? आता, "नाठाळाचे काठी देऊ माथा"चा अर्थ नेमका कसा लावला जाणे अपेक्षित आहे? "नाठाळाच्या टाळक्यास काठी देऊ" (पक्षी: "नाठाळाच्या टाळक्यात काठी हाणू") असा, की "नाठाळाच्या काठी(स) (आमचा) माथा देऊ"(पक्षी: "नाठाळ काठी घेऊन आला असता, त्याच्या काठीसमोर आम्ही आमचा माथा नम्रपणे (तरीही खंबीरपणे) तुकवू (त्याच्या काठीस आमचा माथा अर्पण करू)", असा? कोणी याबद्दल खात्रीलायक माहिती पुरवू शकेल काय?)