महासत्ता होता होता महागसत्ता झाला देश...
दररोज वाढते ती दरवाढ .. सगळेच वाढतेय ... त्यामुळे दरवाढ अपरिहार्य ...असो
व्यसनं कमी करावीत, चैनीच्या गोष्टी कमी कराव्यात आपला खर्च आपण आटोक्यात ठेवावा... प्रत्येकाने स्वतःची आर्थीक घडी नीट करावी ... विणाकारण दुसऱ्याबरोबर स्पर्धा करणे सोडून द्यावे...
कामाचे तास वाढवून व सुट्ट्या कमी करून काय होणार, जेवढा वेळ कार्यालयात आहे तेवढा वेळ प्रामाणिकपणे काम केले सगळ्यांनी तरी पुष्कळ होईल. टी/ लंच ब्रेक कमी करावे, वेळेत काम करावे आणि वेळेत घरी जावे, कुटुंबासमवेत मजेत वेळ व्यतित करावा. आनंदी राहीले की बाकीच्या गोष्टी सुद्धा सहज स्विकारता येतात आणि प्रतिकूल परिस्थितीही नीट सांभाळता येते.
भ्रष्टाचार - तो कमी झाला पहिजे / केला पहिजे ... पण स्वतः त्यातून बाजूला
साधे आर. टी. ओ. मध्ये गेलो तरी रांग बघून आपण एजंट गाठतो. सिग्नल तोडून पुढे गेलो आणि मामा ने पकडले तर लगेच ५० ची चिरिमिरी सरकवतो... (एखाद दुसरा अपवाद ... ) ...जो पर्यंत आपणच हे बदलत नाही तो पर्यंत सुधारणा होणे अवघड.
टाळी एका हाताने वाजत नाही... देणारा आहे म्हणूनच मागणारा पण सोकावतो ना ...