दरवाढीला आपणही तितकेच जबाबदार आहोत. अमुक एक वस्तू आम्हाला लागतेच, मग जास्त भावाने ती आम्ही विकत घेणारच. जास्त पैसा 
असणारे त्याहीपेक्षा जास्त भावाने विकत घेणार. मग दर खाली येतीलच कसे ? व्यापारी नफेखोरीची वृत्ती सगळ्याच पुरवठा करणाऱ्या संस्था आणि
कंपन्यांमध्ये बोकाळलेली आहे. ते संधीचा फायदा घेणारच आहेत. अशा रितीने खूप पैसा मिळवला तर कौतुक होते आणि नाही मिळवला तर 
वाट्याला तुच्छता येते. तपशीलात लिहिल्यास मोठा निवंध तयार होईल. एकूण सामाजिक जडण घडणच अशी स्वीकारलेली आहे की त्यातून 
कोणाचीच सुटका होणार नाही. कोणताही उपाय ह्या धाटणीतच कोणत्याही परिणामाशिवाय  फिरत राहतो .