'सिग्निफिकंट अदर'साठी 'हे' किंवा 'ही' हा (लिंगानुरूप किंवा दोन्ही जोडीदार समलिंगी असल्यास नात्यातील भूमिकेनुसार) प्रतिशब्द वापरता येईल असे वाटते.

अरे हो की! मराठीतील हा पारंपरिक पर्याय अंमळ विसरलोच होतो. लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.

पण मुळात वंध्यत्वाची समस्या असल्यास आई होण्यापूर्वी एखादी व्यक्ती सासू कशी होऊ शकते हा मूळ प्रश्न सोडवावा असे वाटते.

आपली शंका रास्त आहे. 'बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई' हे सुप्रसिद्ध अजरामर गीत ऐकून आमच्याही मनात अशीच समस्या जागृत होत असे, हेही या निमित्ताने येथे नोंदवू इच्छितो.

मात्र, आपल्या समस्येचे उत्तर हे त्या मानाने खूपच सोपे आहे. काही शक्यता लक्षात येतात, त्या अशा:

- दत्तकविधानाने सासू.
- मानलेली सासू.

शिवाय, आपला प्रश्न हा 'वंध्यत्वाची समस्या ही सासू होण्याअगोदर आलेली आहे' या चुकीच्या (आणि माझ्या लेखी डळमळीत) पायावर आधारलेला आहे, असे अत्यंत नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो. म्हणजे, वंध्यत्वाची समस्या अगोदर नव्हती, परिणामी (कालपरत्वे) व्यक्ती सासू झाली, आणि आता अचानक (या (उतार)वयात) वंध्यत्वाची समस्या - अर्थात, ती (पुन्हा एकदा) आई बनू शकत नाही*, ही समस्या - तीस (अचानक) भेडसावू लागली आहे, अशीही शक्यता कृपया लक्षात घ्यावी.


* ती भलेही पुन्हा एकदा** आई बनू चाहेल. परंतु तिचा मुलगा हा 'मम्माज़ बॉय'*** नसल्याकारणाने**** सहकार्य करू इच्छीत नाही, त्याला कोण काय करणार?
** म्हणजे, मध्यंतरीच्या काळात ती आई नव्हती, अशातला भाग नव्हे - आठवा: 'स्त्री ही (क्षणाची पत्नी, परंतु) अनंतकाळाची माता असते', वगैरे वगैरे - परंतु मध्यंतरीच्या काळात या बाबीचे तिला विस्मरण झालेले असणे, आणि (कदाचित आता सून आल्याकारणाने) आता अचानक प्रकर्षाने जाणीव होणे, हीदेखील शक्यता विचारात घेण्यायोग्य आहे.
*** कृपया याही संज्ञेकरिता उचित आणि पर्याप्त मराठी पर्याय आपण - किंवा अन्य कोणी - सुचवू शकल्यास आपला - किंवा अन्य कोणाचा - आजन्म ऋणी राहीन.
**** किंवा, पर्यायाने, तिची मुलगी ही 'मम्माज़ गर्ल' नसल्याकारणाने.