कुपीचेही यशस्वी लँडींग

फिलिक्स यशस्वीरीत्या जमिनीवर पोचल्यावर नियंत्रण कक्षातील टीमने लगेच कुपीला परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली.

त्यासाठी हिलियम बलूनपासून वेगळे कसून एका विशेष पॅराशूटच्या साहाय्याने कुपीला जमिनीवर परत आणण्यात आले. उड्डाणाच्या ठिकाणापासून अंदाजे ७० मैल व फिलिक्सचे लँडिंग जेथे झाले त्या स्थानापासून ५५ मैल पूर्वेला एका शेतात कुपीचे लँडिंग झाले.

लँडिंगच्यावेळी होऊ शकणाऱ्या आघातापासून आतील उपकरणांचे रक्षण करण्यासाठी कुपीच्या रचनेत विशेष काळजी घेण्यात आली होती. जसे कुपीच्या खालच्या बाजूला २ इंच जाडीचे ऍल्यूमिनियमचे क्रश पॅडस लावण्यात आले होते. हि कुपी पुन्हा पुन्हा वापरण्यायोग्य आहे.

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार