आई होण्यासाठी प्रचंड कष्ट पडतात. सासू होण्यासाठी एवढे कष्ट पडत नाहीत

हे विधान मुळ्ळीच पटणारे नाही.
सासू होण्यासाठी आधी आई होणे गरजेचे आहे. (एखाद्या/दीची 'मानलेली आई' होणे शक्य असले तरी 'मानलेली सासू' हा प्रकार तसा अपरिचित आहे. त्यामुळे सासू ही बहुतांश वेळा ही खरी सासू असते (व मानलेली नसते) असे मानण्यास हरकत नसावी). त्यामुळे (मानलेली/दत्तक/किंवा खरी ) आई होण्याशिवाय एखादी व्यक्ती सासू होऊ शकत नाही. त्यामुळे सासू होण्यासाठी लागणाऱ्या कष्टांमध्ये आई होण्यासाठी लागलेले कष्ट हे अध्याहृतच आहेत.

सासू होण्यासाठी लागणारे कष्ट = आई होण्यासाठी लागणारे कष्ट + क्ष

जरी 'त्यामुळे फुकटात मिळालेलं हे लाभाचं पद आहे' (म्हणजे क्ष = 0) हे मान्य केले तरी सासू होण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची किंमत 0 असते हे सिद्ध करण्यासाठी आई होण्यासाठी लागणाऱ्या कष्टांची किंमतही 0 असणे आवश्यक आहे.

म्हणजेच सासू होण्यासाठी लागणारे कष्ट हे किमान आई होण्यासाठी लागणाऱ्या कष्टांएवढेच (अधिक क्ष कष्ट इतके) असतात हे सिद्ध होते.

तुमच्या दुसऱ्या विधानाचा फोलपणा सिद्ध करणे फारसे अवघड नाही

त्यामुळे फुकटात मिळालेलं हे लाभाचं पद आहे

मुळात एखादी व्यक्ती आई होते तेच मुळात सासू होण्यासाठी. कोणत्याही आईला आपला मुलगा/गी अविवाहित राहून त्या/तिने केवळ जन्मदात्रीला आईपद मिळवून देण्याइतकीच कर्तव्यपूर्ती करावी असे (सन्माननीय अपवाद वगळता) वाटत नाही. आईची अपेक्षा ही आपल्या मुला/लीने लग्न करावे (व जन्मदात्रीला एकदाचे सासू करावे व ह्याप्पिली एवरआफ्टर वगैरे) हीच असते. त्यामुळे जन्मदात्रीने घेतलेले कष्ट हे मुळात सासू होण्यासाठीच घेतलेले असतात त्यानिमित्ताने (एक बायप्रॉडक्ट म्हणून) आईपद पदरात पडले तर आईपद हे फुकटात मिळालेलं लाभाचं पद म्हणता येईल.


गांभीर्याने विचार केल्यास तुम्हाला हे पटण्यास फार कष्ट पडणार नाहीत.