पण आपण एकच बाजू बघतो, दुसरी बाजू अंधारातच राहते. सासू ने आई होणे काय किंवा सुनेने मुलगी होणे काय सारखेच भाव भावनांचा काय तो फरक. ह्यात आपल्या लोकांची पण विचार धारा कारणीभूत आहे अस मला वाटत. कारण आपण मुळातच मुलींना अश्या प्रकारे वाढवतो की बाई तुला सासरी जायचे आहे, काय माही त तिथे कशी लोक मिळता. त्यातल्या त्यात सासूनावाचा बागुलबुवा किशोर अवस्थेपासूनच मनी बिंबवतो, आणि त्याची मिळालेली पावती म्हणजे हे नाते. सासूच्या देखिल सुनेबाबत फार काही चांगल्या अटकळ नसतात. शिवाय त्यातल्या त्यात हा समाज चांगल्या गोष्टींची चर्चा करणार नाही पण एखादी सून तिच्या सासूला किती त्रास देते तो अगदी होता नव्हता तेवढा अंगाचा लावून सामाजिक चर्वण करत बसतील. त्याचा परिणाम हा मनावर होणारच.