लिखाणात एखाद्या वेळेस काही इंग्रजी शब्द/वाक्य रोमनमध्ये लिहिणं आशयाच्या दृष्टीनी इष्ट व अपरिहार्य असतं. पण मनोगतवर लिखाणात रोमन अक्षरांना जवळजवळ पूर्ण प्रतिबंध आहे. त्याला दहा टक्क्यांची मर्यादा आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षांत रोमन अक्षरांचा वापर एक टक्क्यापेक्षा कमी असला तरीही लाल अक्षरात ती सूचना दाखवली जाते आणि लिखाण स्वीकारलं जात नाही असं आढळून आलं आहे. इतरांचाही असाच अनुभव आहे का?