मनोगतवर लिखाणात रोमन अक्षरांना जवळजवळ पूर्ण प्रतिबंध आहे. त्याला दहा टक्क्यांची मर्यादा आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षांत रोमन अक्षरांचा वापर एक टक्क्यापेक्षा कमी असला तरीही लाल अक्षरात ती सूचना दाखवली जाते आणि लिखाण स्वीकारलं जात नाही
हे निरीक्षण/अनुमान बरोबर वाटत नाही. असे एखादे उदाहरण असल्यास वेळ मिळेल तेव्हा प्रशासनास ह्या पत्त्यावर विपत्राने पाठवावे.
दहा टक्क्यांचा हिशेब करताना रोमन अक्षरांची गणना सरळ ए बी सी डी ह्या अक्षरांप्रमाणे होते आणि देवनागरी अक्षरांची गणना 'रो - म - न - अ - क्ष -रां - चा - वा - प - र' अशा पद्धतीने होते. अक्षरांव्यतिरिक्तच्या खाणाखुणा कुठल्याच बाजूला गणल्या जात नाहीत. तरीही समजा तुम्ही उदाहरण पाठवले आणि त्यातून काही चूक निदर्शनास आली तर सुधारणेचा प्रयत्न नक्कीच होईल.