भारतातून विद्यार्थी म्हणून आलेली मराठी मुले असो व नोकरीसाठी आलेले व्यावसायिक त्यांना भारतातील इतर राज्यांबद्दल बरीच माहिती असते
पटलं नाही बुवा. माझ्या माहितीत असे अनेक मराठी लोक आहेत ज्यांना महाराष्ट्रातील (त्यांचा जिल्हा सोडला तर) इतर जिल्ह्यांबद्दल देखील विशेष माहिती नाही आहे.
बहुसंख्येमुळे त्यांना काही फरक पडत नाही.
ह्याबाबतीत सहमत आणि सहानुभवी आहे. पण मला वाटते हे केवळ एक विशिष्ट भाषा बोलणाऱ्यांना नाही तर सर्वांनाच लागू होते... माझा उत्तर भारतीय लोकांबाबत देखील असाच अनुभव आहे. हिंदी ही भारताची 'राष्ट्रभाषा' असल्याने ती सर्वांना आलीच पाहिजे आणि सर्वांनी हिंदीतच (फार तर इंग्लिशमध्ये) बोलले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा (वाचा - मागणी) असते. दहा उत्तर भारतीय लोक सोबत असता मी आणि माझी बायको एकमेकांशी देखील मराठीतून बोलू शकत नव्हतो. तसा आम्ही प्रयत्न केला तेव्हा 'नो वर्नॅक्युलर अलाउड' असं ऐकावं लागलं. शेवटी काय, 'बळी तो कान पिळी'!