लेखन, मांडणी अप्रतिम. अतिशय मोठा विषय थोडक्यात पण छान मांडलात. आमच्या सोसायटीत सार्वजनिक गणपती गेली अकरा वर्षे होत होता. सुरुवात करणाऱ्यांना मी माझा जुना अनुभव सांगून ह्यात नंतर जात, धर्म येतात असे सांगितले होते. कोणालाच ते पटले नव्हते. ह्यावर्षी त्या कमिटीने सांगितले की वारंवार आवाहन करूनही कोणीही पुढे येवून गणपती बसवत नसल्याने आम्ही आता निवृत्त होत आहोत. आता आपल्या स्वभावधर्माप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व काही अंगिकारून येथलेच होवून धंदा करणारे गुजराती पुढे आले आणि त्यांनी गणपती बसविला. ध्वनी-प्रदुषण, कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम नसलेल्या उत्सवाला बहुसंख्य मराठी गेले नाहीत. मीही रोज गेलो नाही. आपल्या लेखातील मुद्दा हाच आहे की , देव का कोणा एकाचा आहे?. पण मुळ मुद्दाच असा आहे की बहुभाषिक भारतात, प्रांतवार सण असतात. बैसाखी, पोंगल, नवरात्री ई. मराठी माणसांनी पंजाबी लोक तीथे उपस्थित असताना भांगडा आमचाच आहे असे केले तर त्यांना ते आवडेल का? मग तामिळांनी मराठी मंडळी तीथे असताना मुद्दाम गणपती बसविणे, गुजराती समाजाने धंदेवाईक दृष्टीकोन ठेवून गणेशोत्सव करणे हे कितपत योग्य आहे? मुळातच मराठी मंडळीमध्ये सहिष्णुता एव्हढी आहे की ते कोणाचाही द्वेष न करता आनंद घेतात. बघा ना, मुंबईतील तीन चतुर्थांश घरेसुद्धा त्यांनी इतर भाषिकांना देवून टाकली. ईमाने इतबारे गरबा रमवायला जातात. मुंबई एक दिवस गुजरातला जोडली जाईल आणि आम्ही फक्त उत्तर भारतियांविरुद्ध ओरडत राहु. मुळ विषयाकडेः राज्या-राज्याप्रमाणे सणवार असतात ते त्यांनीच केले तर वादाचा विषय उद्भवणार नाही असे वाटते. कोणत्याही समाजाबद्दल माझा राग, टोमणे नाहीत. तरीही कोणीही दुखावले असल्यास क्षमस्व.