आज पुन्हा एकदा 'त्या' आपल्या मनोगतावर आल्यासारखे वाटले. एखादा लेख येतो आणि त्याच दिवशी अनेक प्रतिसाद लिहिले जातात व ते दृश्यमानही होतात! उत्तम.

जरा वेगळ्या प्रश्नावरचे हे कथन आवडले, पण अमेरिकेसारख्या परक्या देशातही आपण एक नसतो हे खरे आहे का? बहुधा परक्या मातीत सर्व भारतीय एकमेकांना जवळचे वाटत असावेत असा समज होता. महाराष्ट्र मंडळांमध्येही गट असतात असे ऐकले होते पण गणेशोत्सवाचे भाषिक विभाजन म्हणजे जरा अतीच वाटले. अर्थात तिथे राहणारेच यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.