टक्केवारीची मर्यादा सांभाळण्यासाठी आणखी एक उपाय मी सुचवू इच्छितो. जर इंग्रजी शब्द वा वाक्य वापरणे अपरिहार्यच आहे असे लेखकास वाटत असेल तर तो शब्द वा ते वाक्य देवनागरीमध्ये लिहावे. उदाहरणार्थ - cute हा शब्द क्युट असा लिहावा. किंवा 'आय थिंक आय मस्ट राइट धिस ऍज इट इज इन इंग्लिश ऍज आय स्ट्राँगली फील दॅट मराठी ट्रान्सलेशन मे नॉट बी इफेक्टिव'

अजानुकर्ण,   मनोगतच्या धोरणामुळे मराठी शब्द मिळाले आणि ते वापरायची प्रेरणा मिळाली या आपल्या म्हणण्याशी मी सहमत आहे.

मनोगतच्या शुद्धलेखनच्या पाठपुराव्याचा मला विशेष उपयोग झाला. मुळात लेखन शुद्ध असावे लागते हे इथे समजले आणि प्रशासन तसेच अन्य मनोगतींच्या टोचणीमुळे मी शुद्ध लिहायच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. किमान आपल्याला अक्कल नाही तर शुद्धिचिकित्सक तरी वापरावा हे पक्के उमगले आणि समाधानाची बाब म्हणजे शुद्धिचिकित्सक वापरताना अलीकडे मला केवळ एखादं दोन शब्दच सुधारावे लागलेले दिसतात व त्यामुळे आपण 'सुधारल्याचा' आनंद होतो.