हाच लेख तेलुगू गणपतीने(!) लिहिला असता तर कसा झाला असता याचा विचार करतो आहे...


आंध्र प्रदेशच्या हैदराबादमध्ये सार्वजनिक गणपतीची पूर्वापार प्रथा आहे. शहराच्या खैरताबाद या भागात ४० फूट उंच मूर्ती बसवतात तर बेगमबझार भागात जिवंत देखावे पाहण्यासाठी लोकांच्या मोठाल्या रांगा लागलेल्या असतात. यावर्षी गणपती विसर्जनाची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता संपली आणि लहानमोठ्या मंडळांचे अडीच हजार गणपती विसर्जनाला आले यावरून इथे गणपती उत्सव किती रुजला आहे याची कल्पना येईल.
अर्थातच महाराष्ट्राचा गणपती उत्सवावर मक्ता नाही. तेलुगूतून (म्हणजे संस्कृतातूनच पण 'हां, आता दुर्वा वाहा - आता कुंकू वाहा' अशा सूचना तेलुगूतून देवून)  केली जाणारी पूजा मराठी माणसांना कदाचित कळणार नाही. पण ' भावनाओंको समझो'.
शेवटी गणेशोत्सव इथून तिथून सारखाच! तो साजरा करणाऱ्यांवर त्याच्या स्वरूप अवलंबून असते. कोणी 'वक्रतुंड महाकाय' म्हणेल   तर कोणी ' देवा हो देवा, गणपती देवा, तुमसे बढकर कौन? ' म्हणेल. मोरया!