मनाच्या शक्तीच्या जोरावर आपल्याला काय कुणालाही जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे प्रकर्षाने जाणवत होतं. कुणाला विश्वासच बसणार नाही की मी अगदी काहीच तयारी नसताना २६. २ मैल / ४२ कि. मि. अंतर धावू शकतो, कुणी ही मला वेड्यात काढलं असतं. मागील वर्षी शारीरिक शक्तीने जिंकलो होतो तर ह्या वर्षी, अभेद्य अश्या मनाच्या शक्तीने.