अजबजी!
आपल्या गझलेतील खयाल आवडले!
पण, खयालांवर अजून चिंतन करायला हवे होते, असे वाटून गेले.
ही एक सुंदर मुसलसल गझल होवू शकते!
अभिव्यक्ती अजून जोरकस असायला हवी होती!
या फक्त नम्र सुचवण्या आहेत.
आपणास पटल्यास त्यांचा विचार करावा.
आपल्या गझलेत असे संभाव्य बदल होवू शकतात.........

शेर नंबर १..........
सानी मिसरा असा केल्यास कसे वाटेल?...........
कधीच नाही मला समजले नशीब माझे!
...........................................................................................
शेर नंबर २..................
उला मिसरा असा केला तर कसे वाटेल?..............
अखेचा श्वास घेत असता मला समजले.........
....................................................................................................
शेर नंबर ३...................
उला मिसरा असा केला तर कसे वाटेल?..............
कशास घासू नशीब तुझिया नशिबावरती?
.........................................................................................................
शेर नंबर ४..............
असा शेर केला तर आपल्या मनातील आशयाला न्याय मिळावा.............
कपाळावरी असतो म्हणती लेख विधीचा;
तू तर नजरेतुनी वाचले नशीब माझे
...............................................................................................................
शेर नंबर ५.................................
असा शेर केला तर आपल्या मनातील आशयाला न्याय मिळावा.............
खरोखरी हे कपाळ माझे मुळी करंटे!
'अजब' म्हणे,' मजला ना फळले नशीब माझे'
...............................................................................................................
टीप: जे भावले, भिडले, प्रांजळपणे वाटले ते लिहिले.
कृपया राग व गैरसमज नसावा!
कुठलीही तुलना करायचा हेतू नाही!
लोभ असावा!
............ प्रा.सतीश देवपूरकर
......................................................................................................................................................................................................................