मिलिंद,
आपल्या गझलेतील खयाल आवडले!
पण, खयालांवर अजून चिंतन करायला हवे होते, असे वाटून गेले.अभिव्यक्ती अजून जोरकस असायला हवी होती!
या फक्त नम्र सुचवण्या आहेत.
आपणास पटल्यास त्यांचा विचार करावा.
आपल्या गझलेत असे संभाव्य बदल होवू शकतात.........
शेर नंबर १.........माध्यान्हीचा असे हवे.
सूर्य काजळणे....भावले नाही. म्हणून आपल्या मनातील खयालांचा आदर करून आम्हास खालील प्रमाणे मतला लिहावा वाटला.............
का अवेळी असा तो ढळू लागला?
भरदुपारी रवी मावळू लागाला!
.................................................................................................................................................................
शेर नंबर २...........सानी मिसरा असा केला तर................?
रोख संवत्सरांचा कळू लागला!
..........................................................................................................................................................................
शेर नंबर ३................खयाल छान, पण अभिव्यक्ती थोडीशी वेगळी असावी वाटले. हा शेर असा करून पाहिला.............
पाखरे दूर जाऊ जशी लागली.........
वृक्ष आतून बघ, उन्मळू लागला!
................................................................................................................................................................
शेर नंबर४.......................असे लिहावे वाटले...........
ऎलपैलातला पूल गेला कुठे?
प्राण देहामधे अडखळू लागला!
...............................................................................................................................................................
शेर नंबर ५..............शेर असा लिहावा वाटले................
पिंड ठेवून ते लोक खोळंबले!
कावळा भोवती घुटमळू लागला!!
..............................................................................................................................................................
टीप: जे भावले, भिडले, प्रांजळपणे वाटले ते लिहिले.
कृपया राग व गैरसमज नसावा!
कुठलीही तुलना करायचा हेतू नाही!
लोभ असावा!
............ प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................................................................................................