कृपया राग व गैरसमज नसावा!
-अजिबात नाही.

सूर्य काजळणे....भावले नाही.
"पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना"

का अवेळी असा तो ढळू लागला?
भरदुपारी रवी मावळू लागाला!
- हा तुमचा, वेगळा शेर झाला. विचारही थोडा वेगळा आहे. माझ्या शेरात मावळणे अवेळी असणे अभिप्रेत नाही, आणि ते मावळणे भरदुपारीही होत नाही आहे. आयुष्य कसे पाहता पाहता उलटून जाते हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.

रोख संवत्सरांचा कळू लागला!
- "भार" शब्द महत्त्वाचा आहे, रोख म्हटले की लगेच अर्थ वेगळा होतो.

पाखरे दूर जाऊ जशी लागली.........
वृक्ष आतून बघ, उन्मळू लागला!
- ही तुमची अभिव्यक्ती झाली. चांगलीच आहे, पण मला "होता तिथे"ची भावना अधोरेखित करायची आहे.

ऎलपैलातला पूल गेला कुठे?
प्राण देहामधे अडखळू लागला!
- अडखळणे= टू स्टंबल, ठेचाळणे. पूल हरपल्याने प्राण जागच्या जागी अडखळेल कशाला? मला अभिप्रेत असलेले दुभंगलेपण तुमच्या शेरात सापडत नाही.

आपला प्रतिसाद आवडला. तुम्ही तुमच्या पिंडानुसार लिहिणार, मी माझ्या. दोघांची अभिव्यक्ती वेगळी असणारच, त्यात आश्चर्य काय? "पिंडे पिंडे मतिर्भिन्ना". :)