मुद्दा योग्य आहे, परंतु ही बहुधा एक अतिसामान्य चूक असावी. (या क्षणी नक्की आठवत नाही, पण बहुधा पु. लं. च्या लेखनातही कोठेतरी पाहिल्यासारखी वाटते. असो, आणि चूभूद्याघ्या. )
कदाचित येथे हा काव्यात्मक परवान्याचा (पोएटिक लायसन) प्रकार म्हणून खपवून घेता यावा काय? म्हणजे, शुक्र हा तारा नसून ग्रह आहे, हे माहीत असूनही आपण 'शुक्रतारा मंद वारा' खपवून घेतो, किंवा 'हंस हा पक्षी, अत एव अंडी घालणारी प्रजाति, आहे; स्वशरीरातून अपत्यजन्म देणारी सस्तनवर्गातील प्रजाति नव्हे' हे ठाऊक असूनही अगदी शिक्षकसुद्धा 'कांता काय वदो नवप्रसव ते साता दिसांची तशी' हे (कोठल्याही) डोळ्याची पापणी न लवतादेखील बिनदिक्कतपणे शिकवू शकतात, तद्वत यांनाही आपले म्हणा की!