काही बाबतीत योग्य असली तरी काही मुद्द्यांमागील आपले विचार नक्की काय आहेत ते कळत नाहीत. उदा. जेव्हा बायका 'गाउन'मध्ये प्रभातफेरीसाठी बाहेर पडतात तेव्हा आपल्याला परदेशातील 'रिवाज' आठवतो पण त्याच वेळी मुलींचे तोकडे कपडे पाहून आपल्या मनास क्लेश का होत आहेत ते कळत नाहीत. परदेशांतील स्त्रिया (केवळ मुलीच नव्हे तर मध्यमवयीन तसेच काही वृद्ध स्त्रियादेखील) बहुतेक तुम्ही पाहिल्या नसाव्यात. (मी पाश्चात्त्य देशात प्रथम आलो तो उन्हाळ्यात. तेव्हा माझ्या भारतीय दृष्टीला गोऱ्या कातडीच्या स्त्रियांना 'टू पीस'मध्ये सूर्यस्नान करताना पाहायची सवय नव्हती. ती दृश्ये मी अगदी चवीने पाहत असे. आता त्याची इतकी सवय झाली आहे की त्याबद्दल काही विशेष वाटेनासे झाले आहे.)
एक तत्त्व मला पटते... जर चोरी होऊ नये असे वाटत असेल तर आपले पैसे/दागिने उघड्यावर ठेवू नयेत !
मुस्लिम समाजातील स्त्रिया तर बुरखा घालतात, त्यांच्यावर होत नाहीत का अत्याचार? स्त्रियांची वेशभूषा आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार हा मनोगतावरच नव्हे तर इतरही संकेतस्थळांवर अनेकदा चर्चिलेला विषय आहे. स्त्रियांच्या वेशभूषेवर अशी टिप्पणी करून आपण पुरुषी मानसिक विकृतींचे समर्थन तर करत नाही आहात ना?
आम्ही पण सगळ्या गोष्टी केल्या, पण लेकांनो दुसऱ्या माणसाला तोंड उघडायला जागा न ठेवता केल्या ! झाकली मूठ सव्वा लाखाची - हा नियम काटेकोरपणे पाळून!
म्हणजे पकडली गेली तर ती चोरी नाहीतर ती चोरी नव्हे? बरे आणि स्वतः केलेले चालते पण दुसऱ्यांनी केले तर ते चालत नाही होय?
वर्जित गोष्टी तुम्ही राजरोसपणे उघड उघड करता आणि वरून बाकीच्यांना म्हणता की OLD GENERATION ?
अहो, कालपरत्वे संस्कृती बदलत जाते आणि पूर्वी वर्जित मानल्या गेलेल्या गोष्टी समाजमान्य होऊ लागतात. असे समजू नका की सर्व 'आचरट' चाळ्यांचे मी समर्थन करीत आहे.
पूर्वी चित्रपटांतून कधीही चुंबनदृश्ये दाखविली जात नसत परंतु आता नटनट्यांचे चुंबन पाहून कपाळावर आठ्या आणण्याचा काळही गेला.
आणि बाकी लोकं जागी होण्याआधीच कोणाची फुलेच तोड, कोणाच्या बागेतली मातीच पळव, तुळस/दूर्वाच काढून ने !!
मला नाही वाटत की हा प्रकार २०१२ सालात सुरू झाला आहे. साधारण १५-२० वर्षांपूर्वी एका आजोबांशी माझा असा वाद झाल्याचा आठवतो आहे. आमच्या इमारतीच्या आवारात लावलेल्या झाडांची फुले ते तोडून न्यायचे. बरे थोडीशी नेली असे नाही तर सर्वच्या सर्व फुले तोडून न्यायचे. त्यांना 'इतरांसाठीही थोडी फुले ठेवत जा' अशी सभ्य शब्दांत केलेली विनंती वायाच गेली होती. असो.
श्वानप्रभू आणि कोणा काका, मामा, दादा याचे रस्तोरस्ती मोठमोठाले फलक लावून अभिनंदन करणारे हितचिंतक ह्यांच्या बदतमिज़ीबद्दल पूर्णपणे सहमत.