हे कडवे आरत्यांच्या पुस्तकात असते. याबद्दल इतरांशी संवाद साधताना त्यांच्या जवळ असलेले आरतीच्या पुस्तकात सहज चाळले अन त्यात ते होते. ते पुस्तक ज्यांचे होते त्यांनाही फार आश्चर्य वाटले.
यूट्यूबवर शोधले असता मिळाले नाही. पण ध्वनिफितीमध्ये नक्की होते.
माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या अनेक भागांत (व महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या मराठी जनांच्या) घरी अथवा गणेशोत्सवात हे कडवे प्रथेप्रमाणे म्हंटले जाते.
बादवे - हि आरती समर्थांनी लिहिली आहे असे ऐकले आहे. याबद्दल कुणी अधिक सांगितले तर बरे होईल.