तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. मी दशकाहून जास्त वर्षे अमेरिकेत आहे. बहुतेकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून मेडिकल इन्शुरन्स मिळतो आणि मिळतो म्हणजे फुकटात मिळत नाही तर त्याचा प्रीमियर दर महिन्याला भरावा लागतोच, जो तुमच्या पगारातून कापूनच बाकी पगार तुमच्या हातात येतो. कामाच्या ठिकाणाहून इन्शुरन्स मिळत नसेल तर स्वतः खरेदी तरी करावा लागतो वा डॉक्टरची सर्व फी स्वतः भरावी लागते. सरकारजमा टॅक्समधून मेडिकल खर्च पुरवला जात नाही.